ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासन याप्रमाणेच ठाण्यात जिल्ह्यातील सर्व हाऊसिंग सोसायटीमध्ये घरपोच वृत्तपत्र देण्यासाठी आज आदेश काढला. राज्य शासनाने 7 जून पासून घरपोच वृत्तपत्र विक्रीला परवानगी दिली असूनही ठाण्यामध्ये घरपोच वृत्तपत्र पोहचवण्यास सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून मनाई केली जात होती.वृत्तपत्र विक्रेत्यांना बिल्डिंग मध्ये प्रवेश दिला जात नव्हता.सोसायटीमधील सेक्युरिटीकडे ठेवण्यास सांगितले जायचे. आणि सिसिरिटी कडे वृत्तपत्र ठेवले तर सर्वांचेच हात लागतात म्हणून ग्राहक ते वृत्तपत्र घेत नव्हते परिणामी ग्राहक वृत्तपत्र बंद करायला सांगायचे. आणि सांगते सोसायटीने घरपोच डिलिव्हरी साठी परवानगी दिली तेव्हापासून आमच्याकडे चालू करा असे सांगायचे.म्हणजेच लोकांना वृत्तपत्रे हवी आहेत पण सोसायटी चे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आडमुठ्या आणि अधिकारात नसताना आडकाठी करणाऱ्या वृत्तीमुळे बऱ्याच ठिकाणी मागणी असून सुद्धा वृत्तपत्रे देता येत नव्हते.याच विषयावर ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने आवाज उठवला आणि ठाणे जिल्हाधिकारी कडे पाठपुरावा केला, आणि अखेर आज या लढ्याला यश आले. याढ्यात पाठपुरावा करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांना, वृत्तपत्रांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो असे ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.
ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन च्या लढ्याला अखेर यश
June 18, 2020
140 Views
1 Min Read

-
Share This!