ठाणे

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून डोंबिवलीतील नाभिक समाजाला मदतीचा हात…

  डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कोरोनाच्या संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या समाजातील अनेक घटकांचे जीवन दयनीय परिस्थितीत आहे.डोंबिवलीतील नाभिक समाजाचा व्यवसाय संचारबंदी मुळे गेले तीन महिने बंद आहे. त्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक चणचण उभी आहे.अश्या चार प्रभागातील नाभिकांना कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अन्नधान्य आणि आर्थिक मदतीचा हात दिला.सामाजिक वावरच्या कडक निर्बंधामुळे नाभीकांना व्यवसाय करणे कठीण असल्याने अश्यावेळी नगरसेवक म्हात्रे यांच्या कडून मिळालेल्या मदतीबाबत नाभीकांनी त्यांचे आभार मानले.तर प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्या परीने संचारबंदीत पीडित नागरीकांना मदत करावी हा मोलाचा उपदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.त्यानुसार ही मदत केली असल्याचे यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले.लडाख मधील गलवान खोऱ्यात चीनच्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्करातील २० जवान आणि अधिकारी शहीद झाले.त्यांना यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!