ठाणे

प्रत्येक गरजू रूग्णाला बेड मिळायलाच हवा : कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टीम म्हणून काम करू नवे ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी अधिका-यांमध्ये जागविला विश्वास.

ठाणे (२४ जून, संतोष पडवळ ) ज्या कोवीड १९ रूग्णाला बेडची गरज आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा आणि त्यासाठी ज्या सुविधा निर्माण करण्याची गरज असेल त्या करू असे स्पष्ट करून आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी टीम म्हणून काम करू असा विश्वास नुतन आयुक्त विपीन शर्मा यांनी सर्व अधिका-यांमध्ये भरला.

श्री. विपीन शर्मा यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व अधिकारी, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून कोरोना कोवीड १९ विषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले.

या बैठकीत बोलताना त्यांनी सर्वप्रथम आपण जे चांगले काम करीत आहोत ते सुरूच ठेवणार असून ज्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे त्यावर प्रभावीपणे काम करणार असल्याचे सांगितले. ज्या कोवीड १९ रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना बेड उपलब्ध करून देण्यापेक्षा ज्या रूग्णांना बेडची खरी गरज आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा. त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे त्या प्राधान्याने निर्माण करू असे सांगितले.

सद्यस्थितीत कोवीडचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सुविधा निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे सांगून डाॅ. विपीन शर्मा यांनी प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य असून त्यासाठी टीम म्हणून काम करूया असे सांगितले.

यावेळी त्यांनी उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्रभाग समिती स्तरावर कशा पद्धतीने काम चालते, कोणत्या अडचणी जाणवतात याची माहिती घेतली. याबैठकीला विशेष अधिकारी, कोवीड १९ रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!