डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत चालक असलेले ४५ वर्षीय राजेंद्र तळेले हे केडीएमटीतील पहिले कोरीना बळी ठरले. कल्याण येथील कर्णिक रोड परिसरातील ४५ वर्षीय तळेले हे गेली १९ वर्ष केडीएमटीत चालक म्हणून काम करत होते.तळेले यांच्या मृत्यूमुळे केडीएमटीतील चालक आणि वाहक हे घाबरले असून आपला आमच्या आरोग्याची प्रशासनाला काहीही पडले नसून आमचा असून इन्सुरन्स का काढला नाही असा प्रश्न संतप्त झालेले चालक आणि वाहक विचारीत आहे.एका चालकाने तर आमचा गेल्या महिन्याचा पगार असून झाला नाही तर हे प्रशासन आमचा इन्सुरन्स काढतील कसे असे सांगितले. याबाबत डोंबिवली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मोहित भोईर यांनी याबाबत पालिका प्रशासनाने वाहक-चालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. केडीएमटीत ५५० वाहक –चालक मिळून असून त्यांची प्रशासनाने स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याशी परिवहन सेवेतील सर्व कर्मचारी वर्गासाठी इन्सुरन्सबाबत बोलणे झाले आहे. तर मनसे जिल्हाअध्यक्ष तथा माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर म्हणाले,पालिकेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे.यांच्या आरोग्याची सर्व जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे.
केडीएमटी चालक राजेंद्र तळेले कोरोनाचा बळी….
June 25, 2020
99 Views
1 Min Read

-
Share This!