मनसेने दिले विविध मागण्यांचे महावितरणला निवेदन
*अंबरनाथ दि. २५ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : लॉकडाऊनमध्ये महावितरणकडून अंबरनाथ शहरातील नागरिकांना १ एप्रिल २०२० पासून जी दरवाढ करण्यात आली आहे ती मागे घेण्यात यावी, जी अवाजवी बिले देण्यात आली आहेत त्यातील भरमसाठ केलेले वीज दरवाढ कमी करावे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रिडींग वरून वीजबिले आकारावे, विजबिलांची रक्कम भरण्यास कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता २-३ हफ्त्यांमध्ये करून सवलत देण्यात द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री यांच्याकडे देऊन मागणी केली आहे. दरम्यान शहरातील कोणत्याही नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यास नाईलाजास्तव महावितरणच्या विरोधात “मनसे स्टाईल”ने आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही भोईर यांनी दिला आहे.
कोरोनाच्या संकट काळामध्ये नागरिक गेल्या मार्च महिन्यांपासून स्वतःच्या व कुटूंबाच्या काळजी पोटी घरी आहेत, या काळात उद्योग धंदे बंद असल्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंबरनाथ विभागामार्फत शहरातील नागरिकांना सलग ३ महिन्यांचे एकत्रित अवाजवी बिले दिल्यामुळे नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच १ एप्रिल २०२० पासून जी दरवाढ करण्यात आली आहे ती मागे घेण्यात यावी, नागरिकांना जी अवाजवी बिले देण्यात आली आहेत, त्यातील भरमसाठ केलेले वीज दरवाढ कमी करावी व प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रिडींग वरून वीजबिले आकारावे, सदर विजबिलांची रक्कम भरण्यास कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता २-३ हफ्त्यांमध्ये करून सवलत देण्यात द्यावी, सदर कालावधीमध्ये शहरातील कोणत्याही नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये अन्यथा नाईलाजास्तव महावितरणच्या विरोधात “मनसे स्टाईल”ने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, मनविसे अध्यक्ष धनंजय गुरव, अविनाश सुरसे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कुणाल भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागणीवरून महावितरण कार्यालयात तक्रार निवारण कक्ष चालू करण्यात आलेले आहे, ज्या नागरिकांची बिले जास्त आले असतील, तर त्यांनी सदर तक्रार निवारण कक्षात आपले विजबिलाची झेरॉक्स घेऊन जाऊन तक्रार नोंदवावी. असे आवाहन अंबरनाथ शहरातील नागरिकांना कुणाल भोईर यांनी केले आहे.