ठाणे

शरद पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह टीका करणाऱ्या आ. पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केले पुतळ्याचे दहन

अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव(मामा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन
 
अंबरनाथ दि. २५ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पडळकर यांच्या विरोधात  जोरदार घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन ही करण्यात आले.
            याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, सोशल मीडिया सेल तालुका अध्यक्ष मिलींद मोरे, कृष्णा पाटील, सुभाष पिसाळ, भगवान महाजन, नामदेवराव गुंडाळे, विनोद शेलार, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, प्रिसीला डीसेलवा यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
              राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा आ. गोपीचंद पडळकर याचा धिक्कार करण्यासाठी आणि गोप्याच्या नावाचा धिक्कार करण्यासाठी आज अंबरनाथमध्ये आंदोलन छेडण्यात आले. गोपीच्या आई-वडिलांनी एक एवढी मोठी चूक केली त्यांचे नाव गोपी ठेऊन, गोपी नाव ठेवण्याऐवजी त्याला गाढव द्यायला पाहिजे होतं, अशी आमची इच्छा आहे, कारण “त्याची लांबी किती, रुंदी किती व उंची किती आणि आकाशाला गवस घालायला निघाला आहे तो भडवा”, “जोपर्यंत तो जाहीर माफी मागणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रभर हे आंदोलन चालूच राहील. असेही अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!