ठाणे

महापालिका आयुक्तांनी साधला थेट नगरसेवक, नागरिकांशी संवाद

 

आज आयुक्तांनी केली वागळेची पाहणी ; तात्काळ निर्णयावर अधिक भर

ठाणे (२६)   : स्थानिक नगरसेवक, नागरिक यांच्याशी थेट संवाद साधत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीचा दौरा केला. या दौ-यामध्ये स्थायी समिती सभापती राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका सौ. सुखदा संजय मोरे, दिपक वेतकर, माजी महापौर संजय मोरे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, सहा. आयुक्त विजकुमार जाधव, कार्यकारी अभियंता श्री. धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष प्रभाग समिती स्तरावर भेटी देवून कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे.आज महापालिका आयुक्तांनी डिसुझावाडी येथील सार्वजनिक शौचालयची पाहणी केली. त्यानंतर शिवाजीनगर, साई मंदीर, हिरामोती भाजी मार्केट परिसराची पाहणी केली.

त्यानंतर डॅा. शर्मा यांनी पडवळनगर येथील फिव्हर क्लिनिकला भेट देवून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक नगरसेवकांशीही संवाद साधून कोरोना कोवीड 19 शी लढा देण्यासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व करण्याची ग्वाही दिली.

या दौऱ्याच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांनी नगरसेवक आणि नागरिक यांच्याशी थेट संवाद साधण्याबरोबरच तात्काळ निर्णयावर भर आहे.

महापालिका आयुक्तांनी वागळे प्रभाग समितीतंर्गत विविध परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक दिपक वेतकर, नगरसेविका सौ. सुखदा मोरे, माजी महापौर संजय मोरे आदी उपस्थित होते…….

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!