डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊन मुळे त्रस्त असलेले नागरिक आता आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा हा त्रास लक्षात घेऊन कल्याणमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले. दिल्ली मध्ये ज्याप्रमाणे २०० पर्यंत जनतेला वीजबिल माफ केले आहे त्याचप्रमाणे दिल्ली पॅटर्न याठिकाणी राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली .
कोरोना महामारीच्या काळात गेली तीन महीने लॉकडाउन काळात अनेक नागरीकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यातच महावितरणने वाढीव लाईट बील पाठून जनतेचे आर्थिकची कोंडी केलेली आहे. यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने ३ जून रोजी राज्यव्यापी आदोंलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, विद्युत महामंडळ यांनी लेखी निवेदन देत ज्याप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने २०० युनिट पर्यतं जनतेला वीजबिल माफ केलेले आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला मार्च, एप्रिल, मे व जुन पर्यतंचे २०० युनिट प्रमाणे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती. परंतु अस न करता याउलट महावितरण प्रशासनाने वाढीव वीजबिल पाठून नागरीकांची आर्थिक कोंडी केली आहे. शिवाय मे महीन्यापासुन विद्युत महामंडळाने वीजदर वाढवलेला आहे. त्याला त्वरीत स्थगिती द्यावी यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आदोंलन करण्यात आले. सदर वीजदर वाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आदोंलन सुरू करू असा इशारा कल्याण लोकसभा आध्यक्ष अॅड.धनजय जोगदंड यांनी दिला आहे. या आंदोलनात रवि केदारे, राजेश शेलार, राजु पांडे, संदीप नाईक, कल्पना आहेर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.