एमजीएल वर गुन्हा दाखल करा – जिल्हा उपाध्यक्ष संतोष घोणे
अंबरनाथ दि. ०१ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : पावसाळ्यात म्हणजे जुन महिन्यापासून कुठल्याही प्रकारचे खोदाई काम करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलेली नाही. तरी देखील अंबरनाथ पश्चिमेकडील मोरीवली नाका ते मोरीवली गांवापर्यंत महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) कडून नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतरित्या कोणतीही परवानगी नसताना रस्त्याचे खोदकाम करून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे, तेव्हा एखाद्या वेळेस सदर ठिकाणी दुर्घटना घडल्यास अथवा झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल येथील ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष घोणे यांनी उपस्थित करत खोदकाम करण्याची परवानगी देणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व महानगर गॅस लिमिटेड यांचे सदर काम तातडीने थांबवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी घोणे यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व उपअभियंता एमआयडीसी अंबरनाथ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
PHOTO GALLERY :

