पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त आज (दि.०१) पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.
विणेकरी विठ्ठल बढे आणि अनुसया बढे (रा. चिंचपूर. जि. अहमदनगर) या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
महाराष्ट्राची, देशाची कोरोनाच्या संकटातून सुटका कर, असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विठ्ठलाला घातले.
दरम्यान, सावळ्या विठुरायाच्या ओढीने आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात.
शेकडो वर्षांच्या परंपरेत या वर्षी पहिल्यांदाच खंड पडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेचा सोहळा वारकऱ्यांविना पार पडत आहे.