मुंबई

मुंबईत पावसाची दमदार हजेरी ; सखल भागात काही ठिकाणी साचले पाणी

मुंबई : मान्सूनच्या आगमनानंतर बराच काळ लांबलेल्या पावसानं आज अखेर मुंबई आणि उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. काल, गुरुवारी रात्रीपासूनच रिमझिम करणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून भलताच वाढला आहे. तर मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांत गेल्या काही तासांपासून पाऊस चांगलाच कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील तुंबले आहे.
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून सायन, परेल, लालबाग, माटुंगा, वरळी, कुर्ला, किंगसर्कल अशा अनेक भागांत पाणी साचले आहे. याशिवाय, उपनगरातील अंधेरी, सांताक्रूझ, घाटकोपरमध्ये संततधार सुरू आहे. तिथंही अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे मुंबईतील वर्दळ तुलनेने खूपच कमी आहे. तसेच प्रवाशांची लाईफलाईन असलेली लोकल ही बंद असल्यामुळे पावसाचा फटका प्रवाशांना बसलेला नाही. मात्र, रस्त्यावरील वाहतूक काहीशी मंदावलेली दिसत आहे.
पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस
पुढील २४ तासांत कोकण आणि मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून संथगतीने सुरु आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!