डोंबिवली ( शंकर जाधव ) : ७ जुलै रोजी दादर येथील राजगृहावर काही समाजकंटकानी हल्ला केला. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करा आणि राजगृह व आंबेडकर कुटूंबाला पोलीस संरक्षण द्या अन्यथा डोंबिवली शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल आसा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे, बाजीराव माने , सुरेंद्र ठोके, प्रभाकर मोरे, अर्जुन केदार रेखा कुरवारे, रजनी आगळे यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सुरेश आहेर यांना दिले.
राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा .. वंचित बहुजन आघाडीची मागणी ..
July 8, 2020
18 Views
1 Min Read

-
Share This!