डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील शिधावाटप दुकान क्र. UMUM/ 39F155 येथे नागरिकांना मोफत धान्य न मिळण्याबाबत व अनियमित धान्य पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी भाजप डोंबिवली पूर्व मंडळ उपाध्यक्ष संजय चौधरी यांच्याकडे आल्या होत्या. याकडे गांभीर्याने लक्ष देत चौधरी यांनी शिधावाटप कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. नागरिकांना मोफत धान्य न मिळण्याबाबत व अनियमित धान्य पुरवठा बाबद त्यांस पत्रा द्वारे लेखी निवेदन दिले. होते.
अधिकाऱ्यांनी चौधरी यांना दोन दिवसानंतर दुकानात रेशनकार्ड धारकांना डाळ देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेंच वाढीव धान्य पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासना प्रमाणे अधिकाऱ्यांनी २०० किलो मोफत डाळ, व स्वस्त दरातील गहू 39/फ 43, व 39/फ 48 या कार्ड धारकांना देण्यात आली. उर्वरित नागरिकांनाही धान्य मिळावे या साठी प्रयनशील असल्याचे चौधरी यांनी सांगितले.