आतापर्यत दोन बसचालक आणि दोन वाहकांचा बळी..
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसचालक रमेश नरे ( ५२ ) यांचा कोरीनाने मृत्यू झाल्याची घटना घडली. कर्जत येथील नरे यांनी २० वर्ष परिवहन सेवेत काम केले होते.त्यांना कोरीनाची बाधा झाल्यावर त्याच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.बुधवारी नरे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्च्यात आई,पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.याआधी बसवाहक हुसेन बादशहा व संजय तडवी आणि बसचालक तळेले यांचाही कोरीनाने मृत्यू झाला आहे.