मुंबई : बारावीचा यंदाचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीपेक्षा 4.7 टक्क्याने निकाल चांगला लागल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातून विज्ञान शाखेसाठी 569,360 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 5 लाख 18 हजार 598 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागाचा निकाल 91.08 टक्के लागला आहे. कला शाखेसाठी 481,288 विद्यार्थ्यांपैकी 350,128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 72.75 टक्के तर वाणिज्य 85.78 आणि एमसीव्हीसी शाखेचा 74.89 टक्के निकाल लागला आहे.