डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीत `धारावी पॅटन` राबविण्याची मागणी होत आहे.पालिकेच्या रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. तर त्याचे रिपोर्ट येण्यास दोन ते तीन दिवस लागतात.नागरिकांची ही अडचण लक्षात घेत आणि त्यांना तपासणी करण्यास विलंब लागू नये म्हणून भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या पुढाकाराने आणि पालिकेच्या सहकार्याने नागरिकांची मोफत कोरोना चाचणी तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका खुशबू चौधरी, प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, डॉ. अनुपमा साळवी उपस्थित होते. या तपासणीमध्ये १५ कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. या रुग्णांना नगरसेविका खुशबू चौधरी यांनी धीर देत उपचाराची सोय उपलब्ध करून दिले, तुम्ही लवकर बरे होऊ आनंदाने आपल्या घरी जाल असे सांगितले.दरम्यान पालिकेतील प्रत्येक नगरसेवकांनी अश्या प्रकारे आपापल्या प्रभागात पालिकेचे सहकार्य घेऊन नागरिकांची मोफत कोरोना तपासणी केल्यास प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल आणि नागरिकांनी रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.
भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या पुढाकाराने नागरिकांची मोफत कोरोना चाचणी तपासणी ..
July 16, 2020
210 Views
1 Min Read

-
Share This!