ठाणे :- ठाण्याच्या टिपटॉप हॉटेलच्या बाजूला असलेल्या विजय सेल्स येथे चोरी करणाऱ्या इसमाला वागळे पोलिसांनी अटक केली आहे, विशेष म्हणजे हा इसम मूकबधिर आहे.
दिनांक ३०/०६/२०२० रोजी रात्री विजय सेल्स या दुकानात चोरी झाली होती, चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील काच फोडून आत प्रवेश करून दुकानातील 2 ऍपल कंपनीचे मोबाईल फोन, १ ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, ५ सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण २,२८,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता, या बाबत वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये ०१/०७/२०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता.
वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला असता, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना संशयित इसम आढळून आला, त्याच्या हालचालीवरून आणि शारीरिक ठेवण यावरून गुप्त बातमीदारांमार्फत त्याचा शोध घेऊन आरोपी तुषार वय ३० वर्षे राहणार गोवा यास ११/०७/२०२० रोजी अटक करण्यात आली, हा इसमाची चौकशी करताना तो मूकबधिर असल्याचे निष्पन्न झाले, मूकबधिर असल्यामुळे त्याची चौकशी करण्यात अडचणी येत होत्या, त्या कमी कर्णबधिर मुलांचे दुभाषक यांना बोलावून त्यांच्या मार्फत आरोपीकडे वारंवार चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली, त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल पैकी एकूण १,२२,००)/- रुपयाचे ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले.