ठाणे

ठाणे महापालिका आयुक्तांनी केला चिरागनगर, धर्मवीर आनंदनगरचा पाहणी दौरा.

ठाणे (17 जुलै, संतोष पडवळ ) : कोरोना कोवीड १९ आणि पावसाळा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज चिरागनगर, धर्मवीर आनंदनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवनला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली.
महापालिका आयुक्त हे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी करून त्या ठिकाणी कोवीड १९ आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने काय उपाययोजना केल्या आहेत तसेच काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याचा आढावा घेत आहेत.
आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी चिरागनगर परिसराची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी चिरागनगर आरोग्य केंद्रला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधला तसेच तेथील रूग्णांचीही चौकशी कोली.
यावेळी त्यांनी चिरागनगर परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी अँटीजन किटसच्या माध्यमातून कोवीड १९ ची चाचणी करण्यात येणार आहे.
यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद नगर येथे मिशन झिरो मोहिमेतंर्गत सुरू असलेल्या मोबाईल डिस्पेन्सरी सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टरांशी आणि रूग्णांशी बातचीत केली. तसेच त्यांनी डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या चाचणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहा रमेश आंब्रे, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त डॉ.चारूशीला पंडीत आदी उपस्थित होते.
PHOTO GALLERY 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!