पनवेल : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आजकाल एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. एकीकडे कोरोनाच्या काळात सलमान खान आपल्या घरीच वेळ घालवत आहे, तर दुसरीकडे स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी त्यानं एक अनोखा मार्ग निवडला आहे. सलमान खान सध्या मेहनत करून शेती करताना दिसत आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडिया अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले होते, यात तो शेती करताना दिसत आहे. आता सलमानने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसत आहे.
सलमान खानने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शेती करताना दिसत आहे. पहिले ट्रॅक्टरच्या मागे नांगर लावून सलमान शेतात नांगरणी करत दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: ट्रॅक्टरही चालवत आहे. हा व्हिडीओ सलमान खानने ‘फार्मिंग’, असे कॅप्शन लिहून शेअर केला आहे.
हाफ पँट घालून सलमान खान सध्या शेती करताना पाहून त्याचे चाहते बरेच खुश आहेत. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याआधी सलमानने शेअर केलेले फोटोही चर्चेत होते. लाँकडाऊनपासून सलमान खान पनवेल येथील फार्महाऊसमध्ये आहे. इथं तो शेतीची कामे करत आहे.
PHOTO GALLERY :