ठाणे

मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या ट्विटची दखल घेत पत्रिपुलावरील खड्डे बुजवून केले डांबरीकरणं….

डोंबिवली ( शंकर जाधव )  :  काही दिवसांपूर्वी पत्रिपुलावर पडलेले खड्डे  माती-चिखलाने भरले होते.त्यानंतर पावसामुळे माती वाहून गेली आणि खड्डे झाले. याची माहिती मिळताच मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी याची माहिती ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  एमएसआरडीसीला दिली होती.    प्रशासनाने याची दखल घेत पत्रिपुलावर  डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
मनसे आमदार प्रमोद (  राजू )  पाटील यांनी ४  दिवसापूर्वी एमएसआरडीसीला पत्रिपुलावर पडलेल्या खड्ड्याबाबत ट्विट केले होते.आपल्या ट्विट मध्ये त्यांनी #कल्याण_पत्रीपुलावर माती-चिखल टाकून खड्डे बुजविण्याचे काम चालू आहे. #MSRDC च्या अभियंते,ठेकेदार यांच्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही,कारण सब घोडे १२ टक्के !  म्हंटले होते आणि आमदार पाटील यांनी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी राधेश्याम मोप्पलवार यांना शक्य असेल तर संपूर्ण कल्याण-शीळ रस्त्याचा पाहणी दौरा काढा, मी पण सोबत येतो असे हि सांगितले.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने खड्डे बजवून आता डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!