अंबरनाथ दि. २२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने “वृक्षारोपण आणि अनुग्रह अनाथ आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटपा”चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांनी केले होते. अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्रं. ५७ मधील जांभिवली गांव/पाडा येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आनंदनगर येथील अनुग्रह आश्रम शाळेतील अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मास्क, सॅनिटायजर आदींचे वाटप करण्यात आले आणि येथील शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, माजी नगरसेविका वृषाली जयसिंग पाटील, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, सोशल मीडिया सेलचे तालुका विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, युवक विधानसभा अध्यक्ष सचिन अहिरकर, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, भगवान महाजन, विकास राजपूत, नामदेवराव गुंडाळे, ओबीसी सेल अध्यक्ष हेमंत जाधव, कृष्णा वामसी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.