मुंबई

मुंबईत रेल्वे स्थानकावर अनोखे वेडिंग मशीन ; प्रवाशांना मिळणार मास्क, सॅनिटायझर.!  

मुंबई ( 23 जुलै, संतोष पडवळ): कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी मास्क (mask) आणि सॅनिटायझर (sanitizer) हे महत्त्वाचं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याचा तो एक भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क लावून आणि सॅनिटायझर घेऊनच आपण निघतो. मात्र घाईबडीत तुम्ही मास्क, सॅनिटायझर विसरलात आणि आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचला असाल तर काळजी करण्याची गरज नाही. मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर (mumbai railway station) असं वेंडिंग मशीन (vending machine) लावण्यात आलं आहे, ज्यातून तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होईल.
दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर वेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर वेंडिंग मशीनप्रमाणेच हे मशीनही काम करतं. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचा कोड टाकून ती वस्तू मिळवा. या मशीनमध्ये मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. एकदाच वापरता येणाऱ्या मास्कपासून ते एन 95 मास्कपर्यंत सर्व मास्क उपलब्ध होतील. शिवाय फक्त 50 ते 100 रुपयांमध्ये हँड सॅनिटायझरही मिळेल आणि ज्यांना ग्लोव्हज हवेत त्यांना ग्लोव्ह्जही मिळतील.
कोरोनाव्हायरसच्या या काळात ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर खूप महत्त्वाचं झालं आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!