मुंबई – शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांची आज मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी ३ वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली. आज त्यांचा अध्यक्षपदाचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला.
२४ जुलै २०१७ रोजी राज्य सरकारने बांदेकर यांची मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर वर्षभराने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. गेल्या 3 वर्षात आदेश बांदेकर यांनी मंदिरातर्फे अनेक चांगले उपक्रम राबवले होते. शहीद सैनिकांच्या विद्यार्थांचा पूर्ण खर्च सिद्धिविनायक मंदिराने उचलला होता.
बांदेकर हे उत्तम कलाकार आहेत. याशिवाय प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि राजकारणी आहेत. यांचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घरा-घरात लोकप्रिय झाला आहे.