ठाणे / दिवा : दिवा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नुकतेच दिव्यात वृक्षारोपण करण्यात आले. गृहनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड , राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद पंराजपे साहेब व माजी सभापती वंडारशेठ पाटील यांच्या यांचा मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादी ठाणे जिल्हा चिटणीस मनोज कोकणे यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्याचे सेवादल संघटक किरण ताटे यांकडून ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी एकूण ४0 झाडे लावण्यात आली प्रसंगी दिपक मोहीते , सुहास सावंत , स्वप्निल जाधव हे उपस्थित होते .

यावेळी प्रदेश संघटक किरण ताटे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी सेवादलाच्या वतीने १० हजार झाडे अजितदादाच्या वाढदिवसा निमीत्त लावण्याचा उपक्रम राबविला असुन त्यांस महाराष्ट्रामध्ये चागला प्रतीसाद मिळाला असून पुढील काळात असे उपक्रम राबवले जातील असे विचार व्याक्त केला .