डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी डोंबिवली येथिल तात्पुरत्या स्वरूपात नव्याने उभारल्या जाणाऱ्या कोविड रूग्णालयाचे काम सुरू असलेल्या जिमखाना मैदान व पाटीदार भवन हॉल या दोन ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांसह पहाणी केली. पाटीदार भवन सभागृहांतील रूग्णालयाचे काम संपलेले असुन लवकरच म्हणजे येत्या दोन तीन दिवसात सुरू होणार आहे.
डोंबिवली जिमखाना येथील काम पूर्ण होण्यास अद्याप १५-२o दिवसांचा अवधी दिसुन येतो. म्हणुन तेथील चार पाच वेंटीलेटर हे शक्य असल्यास तात्पुरत्या स्वरूपात शास्त्रीनगर रूग्णालयात सुरू व्हावे अशी मागणी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे करणार आहेत, जेणेकरुन वेंटीलेटरची गरज असलेल्या रूग्णांची परवड होणार नाही.सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच बरेच रूग्णांना ऑक्सिजन बेड ची कमतरता भासत आहे, त्या साठी ३o व्हेटीलेटर व ऑक्सिजनची सुविधा असलेले बेडसह १७o बेडचे तात्पुरते कोविड रूग्णालय डोंबिवली जिमखाना मैदानावर सुरू होत आहे. ह्या रूग्णालयात डायलॅसिसची सुविधा असलेल्या तीन अद्ययावत बेड ची विशेष सेवा देंखिल उपलब्ध होणार आहे. ही सेवा सध्या संपुर्ण ठाणे जिल्ह्यात फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे किडणी विकार असलेल्या व डायलॅसिसची गरज असलेल्या कोरोना रूग्णांची परवड थांबणार आहे.
पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारती मधे तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले बेड असे एकुण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले आहे. येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे…एका इमारतीत फक्त १५ दिवसात व कमी खर्चात ह्या रूग्णालयाचे काम करून उत्तमरित्या ते उभारण्यात आल्यामुळे आमदार राजू पाटील यांनी त्यावर मेहनत घेणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचे कौतुक केले, तसेच पाटीदार भवनाची संपूर्ण व सुसज्ज इमारत उपलब्ध करून देणाऱ्या पाटीदार समाज्याच्या ह्या सेवाभावी कार्यांचे विशेष आभार लवकरच एक आभार पत्र देवून मानन्यात येतील असे आमदार राजू पाटील ह्यांनि सांगितले. दोन्ही रूग्णालयांच्या पहाणी नंतर लवकरच महापालिका आयुक्त यांची भेट घेवून फक्त महिलांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन केंद्र) सुरू व्हावे जोवर जिमखाना कोविड रूग्णालय सुरू होत नाही तोवर शास्त्रीनगर रुग्णालयातील वेंटीलेटर वाढवावे अशी मागणी करण्यात येण्याचे सांगितले.