मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुमकुम यांनी १०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुमकुम यांचे सकाळी निधन झाले असून या संबंधीची अधिकृत माहिती नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता जगदीप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. नावेद हे त्यांचे सुपुत्र व प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी यांचे भाऊ आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे ८६ व्या वर्षी निधन
July 28, 2020
113 Views
1 Min Read

-
Share This!