डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका संचालित हिंदी माध्यमिक विद्यालयाचा यावर्षी शालांत परीक्षेचा ८१.१३ टक्के निकाल लागला आहे.या शाळेतील एकूण ५३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतील संजयकुमार रावल याला ८६.१३ टक्के मिळून त्याने शाळेत प्रथम क्रमांक मिळविला.दुसरा क्रमाक मिळविणाऱ्या कीर्ती गुप्ता हिला ७७.२० टक्के मिळाले. तर आकांक्षा मिश्रा हिने ७४.८० टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. विद्यार्थाय्च्या या यशामुळे पालिकेच्या शाळेचा शैक्षणिक स्तर सुधारला आहे.शाळेतील मुख्याध्यापिका बिना सिंह, ज्येष्ठ शिक्षक गणेश भानुशाली,सहशिक्षक संजयकुमार दहाड, तानाजी लीलके यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यास विशेष परिश्रम घेतले. याच शाळेतील प्रिया यादव या विद्यार्थिनीने २०१७-१८ या वर्षात ९० टक्के मिळवले होते. तर तिची बहिण कोलम यादव हिने २०१८-१९ या वर्षात ९२ टक्के मिळवले होते. या दोन्ही बहिणीं पालिकेच्या शाळामध्ये पहिला क्रमांक मिळवला होता.
केडीएमसी हिंदी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा ८१ टक्के निकाल
July 29, 2020
28 Views
1 Min Read

-
Share This!