डोंबिवली ( शंकर जाधव ) : एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे चोरीच्या वाढत्या घटना यामुळे डोंबिवलीकर पुरते हैराण झाले आहेत.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करत असताना घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांचा वचक संपला कि काय अशी चर्चा शहरात सुरु आहे. अद्याप एकाही चोरट्याला पोलिसांनी अटक केली नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.विरोधी पक्षातील भाजपने यावर लक्ष देत लॉकडाऊनमध्ये डोंबिवलीतील वाढत्या चोरींच्या घटनेवर भाजपचे पोलिसांना निवेदन दिले.
भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतुत्वाखाली भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी ,नगरसेवक मुकुंद पेंडणेकर, डोंबिवली पूर्व मंडळ माजी अध्यक्ष संजीव बिडवाडकर, डोंबिवली शहर सचिव राजू शेख,भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई,अमोल तायडे, रुपेश पवार, चंद्रकांत पगारे , प्रकाश बसंतराम आदी पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरेयांना निवेदन दिले.चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे आणि ज्यांची घरी चोरी झाली आहे त्यांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू, समान आणि मौल्यवान वस्तू मिळवून द्याव्यात अशी मागणी भाजपने केली आहे.नागरीक आणि भाजपने केलेल्या मागणीचा पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देत जनता संतप्त होण्याआधी चोरट्यांना बेड्या ठोका अशी चर्चा सुरु झाली आहे.