डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली रेल्वे स्टेशन येथील कल्याण साईटच्या मोडकळीस आलेल्या जुन्या प्रवासी पुलाच्या ठिकाणी नवीन पुनर्विकासीत पादचारी पुलाच्या कामाच्या पाहण्यासाठी खासदार रेल्वे समिती प्रवासी समन्वय समितीचे सदस्य भाई पानवडीकर आणि सदस्य कैलास सणस यांनी नवीन पुलाच्या चालू असलेल्या बांधकामाची कामाची पाहणी केली.यावेळी डोंबिवली रेल्वे स्टेशन मास्तर माधुरी मोरे, महिला पोलीस कर्मचारी शेख वुमन आणि नीलिमा भोईर पॉइंट मन राजेश मुंडे, आणि छम्मू बादल आदी उपस्थित होत्या.
खासदार रेल्वे समिती प्रवासी समन्वय समितीचे सदस्य भाई पानवडीकर आणि सदस्य कैलास सणस म्हणाले, नवीन पुलाची कामाची पाहणी करत असताना असे लक्षात आले की, अतिशय उत्कृष्टरित्या सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पहिल्यापेक्षा अधिक रूंद व प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होणार आहे. सूर्यप्रकाश, पुलावर खेळती हवा राहील तसेच येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनकडे प्रवाशांना पाहता यावे या दृष्टीकोनातून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.पूलाच्या पायापासून भरीव आणि मजबूत सपोर्ट देण्यात आले असून खूप सुंदर पद्धतीने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन उत्कृष्टरित्या नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि डोंबिवली स्टेशन मास्तर तसेच खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती सदस्य यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून नवीन फुलाची मागणी केली होती त्याला चांगल्या प्रकारे यश लाभले आहे.