मुंबई

मुंबईला कोरोना पाठोपाठ आता पाणी कपातीचं संकट ; उद्यापासून मुंबईत पाणी कपात. 

  मुंबई, 31 जुलै : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था रुग्णांच्या मदतीसाठी कामाला लागली आहे. हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी घडाळाच्या काट्यावर फिराणारी ही मुंबई एका क्षणात ठप्प झाली. पण मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.
मुंबईकरांना लवकरच पाणीकपतीला सामोरं जावं लागणार आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत शनिवारपासून 20 टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतं.
या महिन्याच्या शेवटापर्यंत वाट पाहून प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती याआधीही समोर आली होती. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा योग्य वापर करा आणि पाणी वाया घालवू नका अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 4.9 लाख दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा आहे. जी ही जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या 34% इतका आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 30 जुलै 2019 रोजी एकूण 82% पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे खरंतर, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!