डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के.वि.पेंढरकर महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय,एनएच-६६, तळेले, कणकवली, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ आॅगस्ट २०२० गुरूवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्राचा विषय कोविड-१९ टाळेबंदीचा विमुक्त जाती आणि भटक्या जमातींवरील परिणाम’ असा आहे.कोविड-१९ या साथीच्या रोगाने/ विषाणूजन्य महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे.याचा परिणाम विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक जन जीवनावर कसा झाला आहे , याविषयी सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत व ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाच्या प्रनेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्षपद प्रभाकर देसाई हे भूषविणार आहेत. चर्चासत्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून भटक्या विमुक्त जातीच्या आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके आणि बी.एन.एन. महाविद्यालय, भिवंडी या महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. सुवर्णा रावळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी यू ट्यूब लिंक https://youtu.be/pfrBA50huqQ
अशी आहे.या कार्यक्रमात होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.