ठाणे

ठाण्यातील खारेगाव टोल नाक्या जवळ  कंटेनर ट्रक खाडीत कोसळला 

ठाणे : ( दि. ३ संतोष पडवळ)  ठाण्याच्या खारेगावच्या टोलनाका शेजारील रेतीबंदर पुलावरून मालवाहतूक करणारा चाळीस फुटी
कंटेनर खाडीत कोसळला ही घटना सोमवारी ( दि ३) सकाळी घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी ठाणेच्या खारेगाव टोलनाक्याजवळ कशेळी पुलाजवळील रेतीबंदर पुलावरून भिवंडी ते नावाशेवा ( जे एन पी टी)  जाणारा एक चाळीस फुटी टाटा कंटेनर ( क्र एम एच ०४ एच वाय ८६९१ ) हा चाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुलावरून खाली खाडीत कोसळला या अपघातामध्ये कंटेनर चालक रमेश पांडे ( वय ५५)  हा या अपघातामधून सुखरुप बचावला असून  त्यांना माजिवडा येथे परम  हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे हा कंटेनर राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा आहे.
या घटनेची माहिती मिळताच नारपोली व कळवा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आर डी एम सी अधिकारी व ठाणे मनपा अग्निशमन दलाची एक गाडी  आपत्कालीन निविदा व क्यूआरव्ही व भिवंडी अग्निशमन दलाचे अग्निशमन इंजिन व एक बोट घेऊन बचाव कार्य चालू आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!