मुंबई : राष्ट्रसंत भववानबाबा,संत वामनभाऊ,संत अावजिनाथबाबा,संत खंडोजीबाबा,संत शेकुजीबाबा,क्रांतिवीर वसंतराव नाईक, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने अाणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे सामाजिक नेतृत्व स्विकारुन हि सामाजिक संघटना सामाजिक क्षेत्रात काम करीत असुन भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासोबतच ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सक्रीय काम करत अाहे.वंजारी सेवा संघाने आतापर्यंत विविध क्षेत्रात कार्य केले असुन भटके विमुक्त अाणि ओबीसी चळवळी मध्ये वंजारी समाजातील राज्यातील एकमेव सक्रीय संघटना म्हणून सर्वाना परिचित आहे.मागील ५ वर्षात फक्त सोशल मिडियावर कार्य न करता अगदी शेवटच्या स्तरापर्यंत संघटनेने मजबूत जाळे तयार केले अाहे.समाजातील बौध्दिक व वैचारिक पातळीवर कार्य करणारी संघटना म्हणुन अाज या संघटनेकडे पाहिले जाते. विविध क्षेत्रात कार्यरत अभ्यासू मंडळी उदा.डाॅक्टर,वकिल,प्राचार्य,प्राध्यापक, अभियंते,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते, संशोधक,विचारवंत विशेष करुण मोठ्या प्रमाणात शासकिय व निमशासकिय त्यातही सन्माननीय शिक्षक वर्ग याठिकाणी कार्यरत अाहेत.राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत सक्षम महिलांचे एकमेव संघटन अाज निर्माण करण्यात अाम्ही यशस्वी झालो अाहोत.याचे सर्व श्रेय महिला अाघाडीच्या पहिल्या अध्यक्षा स्व.सविताताई घुले यांचे अाहे हे इथे नमुद करावे लागेल.अाज पर्यंत राज्याच्या सर्वच विभागात हजारो कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन,भटके विमुक्त अाणि ओबीसी चळवळ, प्रशासकिय स्तरावर पाठपुरावा,धार्मिक कार्यक्रम,अारोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, वृक्षारोपन,राज्यस्तरिय वधु-वर परिचय मेळावे, मार्गदर्शन शिबिरे,महिला उद्योजक मेळावे, शैक्षणिक साहित्य वाटप,सध्याच्या लाॅकडाऊन परिस्थित गरजूना धान्य व साहित्याचे वाटप इत्यादी कार्यक्रम यशस्वीपने पार पाडले अाहेत.विविध राज्यातील समाजासोबत समन्वय अाणि अभ्यास व मार्गदर्शन व संघटन सुध्दा चालू अाहे.विशेष म्हणजे दसरा मेळावा प्रसंगी समितीच्या माध्यमातून केलेले कार्य अाणि त्या विविध राज्यात केलेला प्रचार व प्रसार हे अविस्मरणीय अाहे.हि अशी एकमेव संघटना अाहे कि ज्यासंघटने केंद्रे सरकारने भटक्या विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या अायोगासोबत (२०१५-२०१८) सतत समन्वय साधुन होती कारण केंद्रिय स्तरावर अापल्या समाजाचे प्रश्न मांडने अत्यंत गरजेचे अाहे.त्यासाठी संघटनेने अायोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत दोन मोठे कार्यक्रम परळी अाणी नाशिक याठिकाणी घेतले.तसेच विविध भटक्या विमुक्त जाती जमाती,ओबीसी जाती यांच्या विविध संस्था अाणि संघटना यांच्यासोबत सतत समन्वय ठेवला अाहे.अाज संघटनेचे विविध पदाधिकारी अतिशय सक्रियपने या चळवळीत विविध संघटनांच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर कार्यरत अाहेत. समाजातील विविध संस्था अाणी संघटना यांच्यासोबत सतत समन्वय ठेवून नवनविन संकल्पना,नवनेतृत्व निर्माण, वैचारिकता, संशोधनात्मकता यासाठी अाज हे व्यासपीठ समाजासाठी समर्पित अाहे. राज्यात संघटनेच्या सामाजिक कार्याचा विस्तार अधिक व्हावा,संघटन वाढावे यासाठी विविध पदाधिकारी समर्पित भावनेने कार्य करित अाहेत अाणि निरंतर कार्यरत राहतील.इथे कोणीही संस्थापक किंवा मालक नसेल तर समाजासाठी अापण काही देणे लागतो हिच भावना जपली जाते अाणि हाच भाव कायम राहील. या वेळी प्रथमच अाम्ही युवा अाघाडी गठित करित अाहोत.अापण उभा केलेली चळवळ निरंतर चालत राहने गरजेचे असते.त्यासाठी नविन पिढी जी विचाराने,बौध्दिकतेने,शिक्षणाने परिपुर्ण असतील अाणि नोकरी व व्यवसायाने स्वावलंबी असतील इ.सर्व प्रकारे संपन्न व सक्षम अशा युवकांची फळी तयार व्हवी पुढे चालून याच युवकांनी या चळवळीचे नेतृत्व करावे या भावनेने अाम्ही संघटनेते पहिल्यांच युवा अाघाडी गठन करण्याचा निर्णय घेतला अाहे.यासाठी आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आणि यशस्वी युवकांसोबत चर्चा केली आणि सखोल चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे.या युकाकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. समाजामध्ये एक चांगले काम करण्याचा त्यांचा मनोदय अभिनंदनीय आहे.ते भविष्यात समाजामध्ये एक सक्षम युवकांची फळी करण्याचा संकल्प करीत आहेत.अाज प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल फड,कार्याध्यक्ष प्राचार्य डाॅ.खुशाल मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अाणि सर्व कार्यकारी मंडळाच्या चर्चेनुसार वंजारी सेवा संघ(असोसिएशन) ची प्रदेश कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.
वंजारी सेवा संघ(असो.) महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारीणी
प्रदेशाध्यक्ष:-मा.श्री.अनिल देविदास फड
प्रदेश कार्याध्यक्ष:-मा.प्राचार्य डॉ.खुशाल मुंडे
उपाध्यक्ष:-भगवान खेडकर,बाळासाहेब चौधर,प्रशांत नाईक,अभिजित बांगर,बबन बारगजे, अॅड.अमित गिते,कैलास ढाकणे,मिलिंद धात्रक
सरचिटणीस(संघटन):-मा.डाॅ.गणेश अाव्हाड
सरचिटणीस:- मा.श्री.डाॅ.सुनिल कायंदे, मा.श्री.वाल्मिक अांधळे,मा.श्री.व्यंकटेश साठे,मा.श्री.तुषार पोटे
प्रदेश कोषाध्यक्ष/संघटक:-मा.श्री.उध्दव ढाकणे
चिटणीस:-गोविंद मुंडेसंदिप चकोर,
सुनिल कायंदे,अॅड.निवृत्ती कराड,प्राचार्य गजानन कुटे,ज्ञानोबा केंद्रे,रवी घवळे,अतुल बांगर
कार्यालय प्रमुख:-मा.श्री.रविंद्र जायभाये
प्रसिध्दी प्रमुख:-मा.श्री.रविकिरण पालवे
वधु-वर सुचक प्रमुख:-मा.श्री.नामदेव वंजारी
विधी सल्लागार:-अॅड.बापु होळंबे पाटील
:- अॅड.मुरलीधर कराड
महिला प्रदेश अध्यक्षा:-सौ.मनिषाताई मुंडे-वाघ
महिला प्रदेश कार्याध्यक्ष:- सौ.मंदाताई फड
युवा प्रदेश अध्यक्ष:- श्री.तुकाराम नागरगोजे
युवा प्रदेश कार्याध्यक्ष:-श्री.सोपान चौधर
कार्यकारिणी सदस्य:- अभिनय गित्ते,लक्ष्मण थोरवे,जनार्दन तिडके, के.के.सानप,राजेंद्र कांगणे,भगवान बांगर,रवी सिरसाट