डोंबिवली ( शंकर जाधव ) : रिपब्लिकन सेनेतर्फे लॉकडाऊन मधील वाढीव वीजबिल माफ करणेसाठी डोंबिवली (प) येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले. कोरोना महामारिमुळे नागरिक,कष्टकरी, हातावर पोट असलेले सर्वजण त्रस्त झाले असून अश्या काळात महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना वाढीव बिले दिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
रिपब्लिकन सेनेतर्फे डोंबिवली पश्चिम येथे एम.एस. ई.बी.कार्यालय येथे करून वीजबिल रद्द करण्यात यावीत याकरिता सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले.या अगोदरही मुख्य अभियंता,कल्याण यांना रिपब्लिकन तर्फे निवेदन देण्यात आले होते.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पँथर आनंद नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली आयु. विशाल गायकवाड (युवा अध्यक्ष),आयु.मिलिंद घोलप (विभाग संघटक),आयुश्यमती अर्चना गायकवाड(महिला संघटक),छबुबाई नवसागरे(भारतीय बौद्ध महासभा),सर्वेश साबळे,नाना चित्ते,गणेश घोलप,अशोक मोरे,रोहित संदानशिव,जितू पवार,बाबू शिंदे,राहुल महाले,मीराबाई बेडसे, निर्मला बाई वाकोडे, उषा शिंदे,शोभा बाई महाले, सुनीता शिंदे ,बाबू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी वाढीव वीज बिलाबाबत वरिष्ठांशी चर्चा करू असे सांगितले. तर मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लिकन सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेनाद्वारे देण्यात आला.