ठाणे महाराष्ट्र मुंबई

आता पुढील स्टेशन मुंब्रा नाही…..मुंब्रादेवी; नाव बदलण्याकरिता स्थानिक जनतेतून उठवला जातोय आवाज..

मुंबई (दि.12ऑगस्ट, 2020) : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानकाचे नाव बदलून मुंब्रादेवी ठेवण्यात यावे, याबाबत सध्या  स्थानिक जनतेतून आवाज उठवला जात आहे. एका फेसबुक पोस्टवरून या कल्पनेची मोहीम सुरू झाली आहे.

मुंब्रा स्टेशन हे योग्य नावान ओळखले गेले पाहिजे, असे आवाहन केले जात आहे. मुंब्रा शहर हे मुंब्रा देवीच्या वास्तव्याने उभे आहे आणि ओळखलेही जाते. त्यामुळे, या स्थानकाचे योग्य नाव मुंब्रादेवी स्टेशन असेच आहे, असे म्हटले जात आहे. मुंब्र्यातील रहिवाश्यांच्या कानात पुढील स्टेशन मुंब्रादेवी हे उद्गार गुंजले जावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

मुंब्रा येथील रहिवासी आशिष कनोजिया यांनी या पोस्टमध्ये काही इतिहासाच्या नमूद पाऊलखुणांचाही उल्लेख केलेला आहे. या शहरात छत्रपति संभाजी महाराज यांनी काही काळ घालवला होता. त्याचबरोबर मुंब्रादेवीचेही दर्शन त्यांनी घेतले होते. ज्या मुंब्रादेवीचे मह्त्त्व एवढ्या काळापासून चालत आले आहे, त्या ठिकाणालाही आता देवीच्या योग्य नावानेच ओळखले गेले पाहिजे, असे सांगितले जात आहे.

या संकल्पनेची अंमलबजावणी होण्याकरिता ही पोस्ट मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आशिष कनोजिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यापाल भगतसिंग कोश्यारी, रेल्वे मंत्री पियुष गोयेल आणि ठाणे कलेक्टर यांना पत्र व्यवहाराद्वारे यासंदर्भातील मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या शेवटी Ministry of Railways, Government of India Piyush Goyal, CMOMaharashtra, Devendra Fadnavis, Niranjan Davkhare यांना टॅग करण्यात आले आहे. या पोस्टला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकार याविषयाकडे कधी लक्ष घालतील, याकडे स्थानिक जनतेचे संपूर्ण लक्ष लागलेले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!