ठाणे

प्रतिबंधित क्षेत्रात फिरती विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिका आयुक्तांची अभिनव संकल्पना

ठाणे (17 ऑगस्ट, संतोष पडवळ ) : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्रात राहात असलेल्या नागरिकांना श्री गणेशाच्या विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या अभिनव संकल्पनेमुळे प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती बाहेर पडल्यामुळे होणारी संसर्गाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीव्दारे गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग योजनाही राबविण्यात येत आहे.
तथापि प्रतिबंधित क्षेत्रातील गणेश मुर्तींचे विसर्जन घरीच करण्याविषयी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून फिरती विजर्सन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संकल्पनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रीम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसरेजनायाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विजर्सन व्यवस्थेतंर्गत श्री गणेशाचे कृत्रीम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधीवत विसर्जन करण्यात येते त्याच पध्दतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.
महापालिकेच्या तीन परिमंडळांमध्ये तीन वाहनांव्दारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असून राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली फिरती विसर्जन व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!