नवी मुंबई : मनसे कोरोना महामारीने एकीकडे सामान्य नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न बिकट असताना, दुसरीकडे नागरीकांकडे दोन वेळच्या जेवणाच्या पंचाईत असताना देखील वाढीव वीज बिल पाठवले जात होते. या विरोधात आज आक्रमक होत मनसेने एक्सप्रेस वे रोखून धरला होता.
पनवेल परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वाढीव विज बिले पाठवली जात होती.या वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज मनसेने आक्रमक पावित्रा घेतला. मनसेने कळंबोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती जाणारी वाहतूक रोखत जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक पणे आंदोलन केल्याने पोलीस व प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर जवळ पास एक तास हा महामार्ग रोखून धरल्यानंतर पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.