डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाच्या काळात अनेक जणांना आर्थिक झळ बसली आहे. व्यवहार ठप्प झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना कॉलेज फी भरण्यात सवलत मिळावी ही अभाविपची मागणी आहे. यासाठी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात अभाविपने भीक मांगो आंदोलन केले.
शैक्षणिक शुल्क ४ टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. विद्यार्थी ज्या सोयी सुविधांचा वापर करत नाही त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये ,ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे अशी मागणी करत अभाविपने भीक मांगो आंदोलन केले. डोंबिवली शहरमंत्री आलोक तिवारी, शहर सहमंत्री दीपक शर्मा, शहर एसएफडीप्रमुख हरीओम शर्मा, मनन घाडीगावकर, यश बराई हे कार्यकर्ते उपस्थित होते.