ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा शहर चिटणीस मनोज कोकणे यांनी कोरोना विषाणू संदर्भात शासन प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशांचा भंग करुन 20 ते 25 लोकांचा जमाव एकत्रित घेऊन येऊन निलेश कापडणे याला मारामारी करणार्या आरोपींना अटक करा, राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो अशा घोषणा देऊन दिव्यात बेकायदेशिरित्या रास्ता रोको केला. तसेच घटनास्थळी बंदोबस्तासाठी हजर असणारे पोलीस उपनिरीक्षक यांच्याविषय मनोज कोकणे याने “हा सरडे असाच बोलतो, बघा रे याला” अशी जमावाला चिथावणी दिली व जमावातील हिमांशु सूर्यकांत कदम यांनी लोकसेवक व सोबत पोलीस अंमलदारांना घेराव घालून धक्काबुक्की केली.
घटनास्थळी आरोपी मनोज कोकणे याने त्यांच्या हातातील छत्री फिर्यादी लोकसेवक यांच्या डोक्यात मारली तर आरोपी राहुल शिंदे याने हातातील राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा झेंडा असलेल्या काठीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारली प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सरडे यांच्या फिर्यादीवरून मुंब्रा पोलिसनी मनोज विष्णू कोकणे , विषय विठ्ठल वाघ , हिमांशू सूर्यकांत कदम ,राहुल चंद्रकांत शिंदे या आरोपीना अटक केली असून अजून तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपी मनोज कोकणे याच्यावर ४०८/१४ अंतर्गत कलम ४२०, ३४ वडाळा टी. टी. पोलीस ठाणे (प्रलंबित ) , ३४१/२०१२ अंतर्गत कलम ३५३, ५०४, ५०६, ४२७ माटुंगा पोलीस ठाणे तर १२०३/२०१६ कलम ३२४, ३४ कळवा पोलीस स्टेशन, १४३/२०१८ अंतर्गत कलम ४२० ,३४ मुंब्रा पोलीस ठाणे असे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.