ठाणे

घरच्या घरी श्री गणपती विसर्जनाकरीता अंबरनाथमध्ये भाजपातर्फे “फिरता हौद”

श्री गणेश भक्तांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
 
अंबरनाथ दि. २३ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातर्फे शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या सहकार्याने अंबरनाथमधील सर्व नागरिकांसाठी “श्री गणपती” विसर्जनासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम घेण्यात आला. “विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी,घरगूती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो आपल्या घरीच,आपल्या परिसरात,आपल्या दारीच व्हावे” यासाठी भाजपा अंबरनाथ शहर आपल्या सेवेत “फिरता हौद” घेऊन येत असल्याचे आवाहन करण्यात आले होते. कोविड-१९ च्या काळात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. गणपती उत्सवाच्या काळात देखील घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा प्रमुख प्रश्न सर्वांना भेडसावत होता. त्यासाठी भाजपातर्फे एक “फिरता हौद” श्री गणेशमुर्ती विसर्जनासाठी प्रत्येक विभागात नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात आला होता.याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत भक्तिभावाने आज दीड दिवासाच्या श्री गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी दिली.
             तसेच ज्यांना गणेश विसर्जनकरीता गणेश घाटावर जावयाचे आहे त्यांच्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.याप्रसंगी  दिलीप कणसे, राजेश नाडकर,राजेंद्र(आप्पा) कुलकर्णी,विश्वास निंबाळकर,श्रीकांत रेड्डी,मंगेश निकाळजे, चेतन पवार,संतोष शिंदे,दीपक कोतेकर,मनिष गुंजाळ, विजय सुर्वे, ईश्वर गुंजाळ, विशाल इरमाली आदी पदाधिकारी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!