ठाणे :- जागतिक कोरोना संसर्ग वाढत असतांना सर्व शासन,पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री,प्रशासन,अधिकारी, कर्मचारी,आरोग्य सेवा,पत्रकार, पोलीस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतःची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत आहेत. सर्व यंत्रणा कोरोना विरोधी लढाईत व्यस्त असल्याने व याच संधी चा फायदा घेत कळवा विभागा अनेक अनधिकृत बांधकामे वेगाने सुरू झाली. या संदर्भात कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळव्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना दिवसरात्र मेहनत घेऊन नियंत्रनात आणली.कोरोना विरोधी लढाईत सचिन बोरसे व्यस्त असतांना वेळोवेळी या अनधिकृत बांधकामाना सूचना व कारवाया केल्या आहेत तरी पण मुजोर व उन्मत्त असणारे तथाकथित बिल्डर्स मंडळी नि कोरोना लोकडाऊन काळात कोणालाही न जुमानता नियम,कायदे धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे सुरूच ठेवली होती.सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यास मोठे यश प्राप्त झाले व त्यांनी तत्काळ आपली तोफ कळव्यातील अनधिकृत बांधकाम वर फिरवली व आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिक्रमण उपायुक्त अशोक कुमार बुरूपुल्ले यांच्या आदेश नुसार कोणत्याही दबावाला भीक न घालता विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहे.या कारवाई मुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्स यांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळे बोरसे यांच सर्वत्र कौतुक होत आहे