ठाणे (२७ ऑगस्ट ) : महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज गणेश विसर्जनाच्या सहाव्या दिवशी शहरातील विसर्जन घाट आणि स्वीकृती केंद्रांना भेटी देवून विसर्जन व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्तांनी आज दुपारपासून आपल्या पाहणी दौ-यास सुरूवात केली. प्रारंभी नीळकंठ वूडस येथील महापालिकेच्या कृत्रीम तलावाची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहा आंब्रे उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी हिरानंदानी मिडोस येथील गणेशमुर्ती स्वीकृती केंद्राला भेट दिली.
त्यानंतर त्यांनी कोलशेत विसर्जन घाटाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी करून भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी तेथील भाविकांशीही संवाद साधून महापालिकेने केलेल्या व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी नगरसेवक संजय भोईर, सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर आदी उपस्थित होते.
कोलशेत घाटांची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी पारसिक विसर्जन घाटाची पाहणी करून त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी उप आयुक्त मनीष जोशी, अश्विनी वाघमळे, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. पारसिक घाटानंतर त्यांनी मासुंदा तलाव येथील दत्त घाटाची पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे उपस्थित होत्या.
महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौ-यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी अधिकारी उपस्थित होते.