ठाणे : धुळे येथे गुरुवारी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कोरोना संकटात परीक्षा न घेता जमा असलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे तसेच ह्यावर्षी शिक्षण शुल्क कमी करावे अशा रास्त मागण्या घेऊन गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यासमोरच अमानुष मारहाण केली होती, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा भाजपा युवा मोर्चा ठाणे तर्फे आज जिल्हाधिकारी ठाणे श्री राजेश नार्वेकर यांना एक निवेदन देऊन ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच ह्या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी ह्या निवेदनातुन करण्यात आली.
ह्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष ठाणे,आमदार अँड . निरंजन डावखरे ,युवामोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील ,ठाणे शहर कार्यकारणी सदस्य रमेश सागळे,नौपाडा युवामोर्चा अध्यक्ष प्रशांत कलांबते, विनायक गाडेकर उपस्थित होते