मनोरंजन मुंबई साहित्य

हिरकणी’ सोनालीला यंदाचा ‘झी गौरव’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मुंबई – ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘झी गौरव’चा पुरस्कार मिळाला असून तिला हा पुरस्कार ‘हिरकणी’ या चित्रपटातील हिरकणीच्याच भूमिकेसाठी मिळाला आहे.

सोनाली कुलकर्णीला या पूर्वी पदार्पणातच ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटासाठी झी गौरव पुरस्कार मिळाला होता. बारा वर्षापूर्वी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात सोनालीने बकुळाची भूमिका समर्थपणे साकारली होती.
त्यावेळी तिचे मोठ्या पडद्यावर ते पदार्पण होते. पहिल्याच चित्रपटात मानाचा पुरस्कार मिळालेल्या सोनालीने पुढे अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन स्वतला सिद्ध केले आहे.

मागील वर्षी दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी ‘हिरकणी’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर हिरकणीच्या नावाने एक बुरुज आहे. एका मातेच्या अनन्यसाधारण धाडसाची ही गोष्ट आहे.

आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी गडाचे दरवाजे बंद झालेले असतानादेखील मोठ्या धाडसाने एक अवघड बुरुज उतरुन आली असा हा कथा विषय आहे.

या चित्रपटासाठी सोनालीने प्रचंड मेहनत घेतली होती. हिरकणीचा कणखरपणा व्यक्त करण्यात ती कुठेही कमी पडली नव्हती. त्यामुळे तिने घेतलेल्या या मेहनतीला या पुरस्कारामुळे पसंतीची पावतीच मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये दुबई येथे असतानाचा एक व्हिडिओ सोनालीने शेअर केला होता. त्यात सोनाली भाकरी करताना दिसत होती. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये सोनालीने हिरकणीच्या शूटींगच्या वेळी रायगडाच्या पायथ्याशी एका घरात भाक-या करायला शिकले याचा उल्लेख केला होता

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!