ठाणे

ठाणे महापालिका अधिका-यांचा प्रभागामध्ये पाहणी दौरा : महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर धोकादायक इमारती आणि इतर कामांची केली पाहणी

ठाणे :- प्रभागातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्या तात्काळ खाली करणे तसेच प्रभागामध्ये इतर घटना घडल्या आहेत का याची पाहणी करण्याविषयी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी काल दिलेल्या आदेशानंतर सर्व सहाय्यक आयुक्तांनी आज सकाळी ८ वाजलेपासूनच आपल्या प्रभागातील धोकादायक इमारती आणि इतर गोष्टींची पाहणी केली. दरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा आज सकाळी ८ वाजलेपासून शहरातील परिस्थितीचा आढावा घेत असून त्यांनी प्रभाग समिती यंत्रणा अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काल अधिका-यांच्या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिका-यांना आपापल्या प्रभाग समितीतंर्गत धोकादायक इमारतींची पाहणी करणे, झाडे पडणे, दरड कोसळणे, चेंबर कव्हर तुटणे आदींची पाहणी करून त्याबाबत तात्काळ पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी आज सकाळी ८ वाजलेपासून आपल्या प्रभागाची पाहणी केली. या पाहणी दौ-यामध्ये सर्व सहाय्यक आयुक्तांनी अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची पाहणी केली. तसेच अन्य इमारती धोकादायक स्थितीत आहेत किंवा नाहीत याचीही खातरजमा केली. त्याचबरोबर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे झाडे पडणे, नाल्याच्या भिंती पडणे, डोंगराळ भागात घरांना इजा पोहोचली आहे का, दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत का याचीही पाहणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली.
PHOTO GALLERY ..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!