ठाणे

विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी केले विषय समिती सभापतींना खाते वाटप

विषय समिती सभापतींचे खाते वाटप

ठाणे.दि.२ सप्टेंबर:  पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांनी आयोजित केलेल्या दि.१५ जुलै २०२० आणि दि.३० जुलै २०२० च्या निवडणूकीमध्ये निवड झालेल्या उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती यांना जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी प्रभार सोपविला होता त्यास आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता  देऊन  विविध विषय समिती सभापतींना खाते वाटप करण्यात आले. यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषद सर्वसाधारण विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) डी. वाय. जाधव (तथा सदस्य सचिव) तसेच जिल्हा परिषद सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

 

 

यावेळी उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती यांना खालीलप्रमाणे खाते वाटप करण्यात आले.

 

१) श्री.सुभाष पवार यांना अर्थ व शिक्षण समिती

 

२) श्री.कुंदन पाटील यांना बांधकाम व आरोग्य समिती 

 

३) श्री.संजय निमसे यांना कृषी,पशुसंवर्धन, व दुग्धशाळा समिती

 

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे, तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची यापूर्वीच पदसिध्द सभापती म्हणून निवड झालेली आहे.  तसेच या सभेत विविध समित्यांवर रिक्त झालेल्या सदस्यांची पद भरण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हिड १९ चे नियम पाळून सभा घेण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!