ठाणे

अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहिम सुरू ; १२ बांधकामे आणि २२१ हातगाडी, टपऱ्यांवर कारवाई.

ठाणे (३ सप्टेंबर, संतोष पडवळ ) :  महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आदेशित केल्यानुसार लॅाकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध आज संपूर्ण शहरामध्ये जोरदार मोहिम हाती घेण्यात आली. आजपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण १२ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर २२१ हातगाड्या,गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई दुसऱ्या दिवसीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

 

आज दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि २१ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत आज केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि २२ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस् आणि १९ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली तर उथळसर प्रभाग समितीतंर्गत आज ३७ हातगाडी, टपऱ्या व गॅरेजेसवर कारवाई करण्यात आली.

वागळे प्रभाग समितीतंर्गत एकूण १७ हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समितीतंर्गत एकूण ५७ हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.


दरम्यान कळवा प्रभाग समितीतंर्गत लॅाकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण २१ हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले तर २७ हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये आज करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले.

सदरची कारवाई परिमंडळ उप आयुक्त आणि सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक यांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण पथकांच्या साहाय्याने करण्यात आली. सदरची कारवाई उद्या दुसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!