अमेरिकेत एनबीएमध्ये अशाच प्रकारचे रिंग हेल्थ डिव्हाइसचा वापर करतात. मुंबई इंडियन्सने स्वत: आपले सुरक्षित वातावरण बनवले आहे. संघातील एका खेळाडूने म्हटले की, “आम्ही डोक्यापासून पायापर्यंत झाकलो गेलो आहोत. पीपीई किट, मास्क, फेस शील्ड व ३ जोड्या ग्लोव्हज दिले. त्यामुळे तुम्ही कोणत्या खेळाडूला ओळखू शकत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला आमच्या सुरक्षेची किती काळजी आहे, हे कळते. संपूर्ण टीम कुटुंबाप्रमाणे आहे.’
आज आयपीएलचे वेळापत्रक होवू शकते जाहीर :
आपीएलच्या १३ व्या सत्राचे आज वेळपत्रक जाहीर होवू शकते, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी दिली. मुंबई व चेन्नई यांच्यात पहिला सामना होवू शकतो. ५३ दिवसांत ८ संघांमध्ये १४-१४ सामने व १ एलिमिनेटर, दोन क्वालिफायर व फायनलसह ६० सामने होतील.
मुस्ताफिजुरला परवानगी नाकारली
बांगलादेश क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली. अहवालानुसार, मुस्ताफिजुरला मुंबई इंडियन्स व केकेआरकडून प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मंडळाने संघ पुढील महिन्यात श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका असल्याने त्याला परवानगी दिली नाही. यंदा लिलावात त्याला कोणी खरेदी केले नाही.