महाराष्ट्र मुंबई

अभिनेत्री कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा.

मुंबई :  कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहचले आहेत. यानिमित्तानं कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, ‘मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम’

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!