ठाणे

भिवंडीतील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; 5 गोदामं जळून खाक

ठाणे – भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदाम संकुलातील गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत पाच गोदामं जळून खाक झाली आहेत.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी खासगी टँकरच्या मदतीने ही आग दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, आग अजूनही धुमसत आहे. या आगीत सर्व गोदामांचे पत्र्यांचे छत, लोखंडी अँगल कोसळले आहेत.

या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तर नेमकी ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही समजू शकली नसल्याचे सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!